सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर शहरातील भारत विकास विद्यालय,भवानी पेठ, मड्डी वस्ती, सोलापूर. येथे लो.टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल चे
अध्यक्ष लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी व सचिव ला.दीनानाथ धुळम यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक राधेश्याम ओझा उपस्थित होते.
याप्रसंगी लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की, 'आधुनिक काळातील युगाप्रवर्तक जहालवादी विचाराचे विचाराचे राष्ट्रपुरुष म्हणजेच लोकमान्य टिळक होत.ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध स्वराज्याची मागणी निर्भीडपणे करणारे जहालवादी विचारवंत, झुंजार नरकेसरी म्हणजे लोकमान्य टिळक होत.इंग्रजांच्या साम्राज्याला पहिला दणका देणारे आशिया खंडातील पहिले पुढारी म्हणजे लोकमान्य टिळक होतं. त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये राष्ट्रवादी विचाराचे बीजारोपण करण्याचे महान कार्य केले. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून त्यांनी जनशक्तीचे संघटन केले व स्वराज्य भावना चेतावली. इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराविरुद विचार मांडले. '"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे,असे प्रखर अग्रलेख लिहून टिळकाने सरकार यंत्रणेचे वाभाडे काढले. याचबरोबर आजच्याच दिनी प्रतिभा संपन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरा करीत आहोत. वाटेगाव चे अण्णाभाऊ साठे यांनी ग्रामीण जीवनातील कष्टकऱ्यांच्या, दलित पीडितांच्या व्यथा वेदनांना,अण्णाभाऊंनी साहित्याचे जोड दिले.या लोकशाहीराने मरगळलेल्या मनातले चैतन्य फुलविले. आजच्या दिनी या दोन्ही महापुरुषांचे विचार आपण आचरणात आणावे असेही म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकुंद पाटील , सागर गुरव , बिडवे ,रेखा घोडके, आदींचे सहकार्य लाभले.कार्यक्रमास्थळी उपस्थित जवळपास 100 मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माने यांनी केले.