नुकतेच शासकीय आदेश काढण्यात आले आहेत आणि त्यात ९ ऑगस्ट रक्षाबंधन आणि ६ सप्टेंबर अनंत चर्तदशी म्हणजेच गणेश विसर्जनाची सुट्टी रद्द करून ती अनुक्रमे ८ ऑगस्ट नारळी पौर्णिमा आणि २ सप्टेंबर गौरी विसर्जनाच्या दिवशी बदलून दिली आहे.खरतर ११ दिवसांचे गणपती जातात म्हणजेच अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या मिरवणुका निघतात.
गणपती चालले गावाला...चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमत असतो.लहानापासून थोरांपर्यंत सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो.साश्रू नयनांनी सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असतात.सर्वत्र देखणा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा असतो.गणपती उत्सव महाराष्ट्राचा प्रमुख उत्सव आहे.या दहा बारा दिवसात सर्वत्र आनंददायक आणि उल्हासित वातसवरण असते.
सर्वच भक्तिमय होऊन जाते.या दिवशी जर सुट्टी दिली नाही तर प्रायव्हेट कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होईल.ते सर्वजण आनंदाला मुकतील.वर्षानुवर्ष अनंत चतुर्दशी ला सार्वजनिक सुट्टी असायची ती यावेळीही कायम ठेवावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.नारळी पूर्णीमेच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र रक्षाबंधन साजरे केले जाते.बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण असल्याने प्रत्येक बहिण वेळ काढून आपल्या लाडक्या भावला राखी बांधायला जात असते.
यावेळी ट्रेन बस खच्चून भरलेल्या असतात.या दिवशीही सुट्टी घोषित व्हायला हवी होती.पण सुट्टी नसल्याने बहिणींच्या आनंदावर विरजण पडले आहे.बहिणी हिरमुसला आशेत.खरतर रक्षाबंधन ९ ऑगस्ट शनिवारी आणि गणपती विसर्जन ६ सप्टेंबर शनिवारी आले आहेत.यावेळी सरकारी निमसरकारी कार्यालये शनिवार असल्याने बंदच असतात.शनिवार वाया जाऊ नये म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी आदेश काढले व सुट्टी बदलून घेतली असे आरोप सर्वसामान्य नागरिक आणि प्रायव्हेट कर्मचारी करीत आहेत.काहीही असले तरी शासनाने सर्वांचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून अनंत चतुर्दशीला सार्वजनिक सुट्टी घोषित करायला हवी.