पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागात दिनांक ५ व ६ ऑगस्ट २०२५ रोजी “Essentials of Cyber Security” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेचे उदघाटन संगणक विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मि. साहिल अन्सारी, वरिष्ठ सायबर सुरक्षा तज्ज्ञ, पुणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. संदीप लिंगे यांनी करून दिला व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यशाळेत सायबर सिक्युरिटीसंदर्भात सांगण्यात आले की, आधार क्रमांक, बँक तपशील, पासवर्ड्स यासारखी संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा आवश्यक आहे. ऑनलाइन बँकिंग करताना डेटा चोरी किंवा फ्रॉड टाळण्यासाठी सायबर सुरक्षा महत्वाची आहे. कंपन्यांचे ग्राहक डेटा, आर्थिक माहिती आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा उपाय गरजेचे आहेत. सायबर हल्ले केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित नाहीत, तर सरकारी यंत्रणांवरही होऊ शकतात. सायबर सुरक्षेसाठी उपाय : मजबूत पासवर्ड वापरा, दोन-स्तरीय प्रमाणीकरण (2FA) वापरा, ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहा, विनामूल्य Wi-Fi वापरताना काळजी घ्या. अशा प्रकारे या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये सायबर सुरक्षेची मूलभूत तत्त्वे, नेटवर्क सिक्युरिटी, डेटा प्रोटेक्शन, एथिकल हॅकिंग, मालवेअर विश्लेषण, सिक्युरिटी टूल्स यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि हँड्स-ऑन सत्रांमधून या संकल्पना अनुभवण्याची संधी मिळाली. सायबर हल्ल्यांची उदाहरणे आणि त्यावरील उपाय विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये सुमारे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.संदीप लिंगे यांनी केले.

