पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागात कार्यरत असलेले प्रा. सचिन महादेव खोमणे यांना नुकतीच भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सीटी) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे मधून अभियांत्रिकी मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोचॅनेल फॉर सॉईल टेस्टिंग इन लॅब ऑन चिप अँप्लिकेशन' या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोध निबंध भारती विद्यापीठामध्ये सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे.
भारती विद्यापीठ, पुणे मधील डॉ. प्रदीप व्ही. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा. सचिन खोमणे यांनी पीएच.डी. पूर्ण केली. प्रा. सचिन खोमणे यांनी मायक्रोफ्ल्युडिक्स या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे ज्यामध्ये मातीतील पोषणतत्व शोधण्यावर भर दिला आहे. या संशोधनात एनपीके डिटेक्शन बाय युजिंग लॅब ऑन चीपची ओळख करून दिली आहे.
प्रा. खोमणे यांची यशस्वी कारकीर्द केवळ प्रबंधापुरती मर्यादित नाही तर त्यांनी पीएच.डी. दरम्यान २ संशोधन पेपर प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत आणि २ पेपर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदानाची ओळख निर्माण झाली आहे. त्यांचे कार्य ‘लॅब ऑन चीप’ क्षेत्रात दीर्घकालीन प्रभाव टाकेल आणि भविष्यातील संशोधनास प्रेरणा देईल. प्रा. सचिन खोमणे यांचे हे यश केवळ त्यांच्या समर्पण आणि कौशल्याचे प्रतीक नाही, तर स्वेरी महाविद्यालय, पंढरपूरला ही गौरवान्वित करणारे असे आहे. डॉ.सचिन खोमणे हे स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये गेल्या १३ वर्षांपासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल मधून त्यांचे १० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. पीएच.डी. प्राप्त झाल्याबद्दल डॉ. सचिन खोमणे यांचा संस्थेचे नूतन सचिव प्रा. सुरज रोंगे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, प्रा. सचिन गवळी, डॉ. करण पाटील आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव प्रा. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी डॉ. सचिन खोमणे यांचे अभिनंदन केले आहे.