सांगली प्रतिनिधी तेज न्यूज
वारीच्या वाटेवरचा मीनल अविनाश कुडाळकर सांगली यांना राज्यस्तरीय जनसेवासन्मान पुरस्कार 2025 हा विश्वरूप ह भ प नामदेव महाराज हरड (आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू सीख महापरिषद उपाध्यक्ष विद्वत परिषद काशी )यांचे हस्ते सातारा सिद्धिविनायक मल्टीपर्पज हॉल येथे देण्यात आला .
यावेळी ओम चैतन्य सद्गुरु स्वामी गिरिजानंद महाराज ओम चैतन्य सद्गुरु स्वामी सीतामाई आणि जपजीवाला संस्थेचे अध्यक्ष एन.ए कदम आणि दत्त संस्थान अक्कलकोट स्वामी मठ आंधळी यांचे विश्वस्त वि.मा .काळे गुरुजी यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या पुरस्काराबद्दल बोलताना जप जीवाला संस्थेचे अध्यक्ष म्हणाले पुरस्कार हा व्यक्तीचा नसून त्यांच्या कार्याचा आणि त्या त्या परिसराच्या पुढच्या पिढीला प्रेरणा असतो. मीनल ताईंचा प्रवास सतत संघर्षातून प्रगतीकडे वाटचाल असा आहे.साहित्य शिक्षण पर्यावरण अध्यात्म अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अथक परिश्रम जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाने प्रयत्न करत जीवनात यशस्वी वाटचाल करून, आपल्या प्रगती बरोबर समाज आणि आपल्या समवेत असणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन, जाणाऱ्या .महिला सक्षमीकरण हा त्यांचा मूळ उद्देश ,त्यांच्या या कार्याला आम्ही राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार 2025 ने आमची संस्था सन्मानित करत आहे .
हा त्यांचा पुरस्कार वारीच्या वाटेवर मिळालेला एक पांडुरंग चरणीचा प्रसाद म्हणावा लागेल. कारण माझी आणि त्यांची ओळख ही वारीत झाली आणि त्यांचा परिचय खूप उल्लेखनीय असल्ने त्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित त्यांच्यासोबत त्यांचा परिवारआणि त्यांचे विहिनबाई व ईवाइ, साधना पेठकर आणि संजय पेठकर हे ही उपस्थित होते.आजपर्यंत अनेक उत्तम पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या समाज संघटनेच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.