कणकवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
|तु सुखकर्ता,तु दु:खहर्ता||काही दीवसातच गणरायाचे आगमन मोठ्या दिमाखात होणार आहे.कोकणात हा सण मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो.प्रत्येकाच्या घरात गणराया विराजमान होणार आहे.टाळ मृदुंगाच्या गजरात भजन, आरत्या होणार आहेत.आरती संग्रह प्रत्येक घरात असावा,हा आरती संग्रह जनजागृती सेवा संस्थेकडून मोफत दिला जाणार आहे.त्याच अनुषंगाने संस्थेच्या वतीने नुकताच गुरुप्रसाद बिल्डिंग, तेली आळी,ता.कणकवली येथे आरती संग्रह प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सन्मानिय प्रमुख पाहुणे चंद्रशेखर उपरकर (अध्यक्ष-लावण्यसिंधु लोककला चित्रपट सहकारी संस्था)सौ.अक्षता कांबळी(वेतोबा फेम सिरीयल मधील गावमामी, अभिनेत्री, अध्यक्ष्या-सिंधुरत्न फाऊंडेशन), अशोक वि.चिंदरकर(सेवा निवृत्त एल.आय्.सी.शाखा व्यवस्थापक, मुंबई), सेवा निवृत्त उप शाखा व्यवस्थापक-स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कणकवली),भरत तोरसकर(जेष्ठ सेवा निवृत्त कर्मचारी,एस.टी.महामंडळ, कणकवली वर्क शॉप), मंगेश चिंदरकर(उद्योजक-कणकवली) यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली.त्यानंतर संस्थचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे संस्थेचा अहवाल,शाल, गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.तसेच उपस्थित सन्मानिय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
सर्वच मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.आरती संग्रह कमी वेळात प्रसिद्ध करुन देणारे अष्टविनायक प्रिंटर्सचे संचालक नितेश विशे तसेच समारंभत सहकार्य करणाऱ्या सौ.गंधाली तिरपणकर यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.प्रकाशनानंतर गणेश भक्तांना आरती संग्रह मोफत देण्यात आले.शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.