पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
वैश्विक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये माइल स्टोन ठरलेल्या माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे, भारत च्या ४३ व्या स्थापना दिन सोहळ्याचे आयोजन दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कोथरूड येथील एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभा मंडपामध्ये सकाळी ९.४५ वा. झाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी फुलगाव येथील श्रुती सागर आश्रमाचे संस्थापक परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, गरीबे इन्स्टिट्यूट फॉर सॉफ्ट पॉवर अँड पब्लिक डिप्लोमसी यूएसचे संस्थापक आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रा. फर्नांडो गरिबे , गरिबे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रोनाल्ड सी. गुनेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड हे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
या सोहळ्या निमित्त "गीत विश्वनाथ , विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा: यात्रा वचनपूर्तीची" या विशेष कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ.संजय उपाध्ये लिखित काव्यांचे गीत गायन प्रा. शशांक दिवेकर यांनी सदर केले. तसेच संस्थेसाठी ज्यांनी अमूल्य अशी सेवा दिली अशा निवडक 18 प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.
यावेळी माईर एमआयटी, पुणे चे संस्थापक विश्वस्त प्रा.प्रकाश बी. जोशी, कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राहुल व्ही. कराड, अध्यक्ष डॉ.मंगेश टी. कराड, विश्वस्त तुळशीराम दा. कराड, विश्वस्त आणि उपाध्यक्ष डॉ. वीरेंद्र एस. घैसास, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.सुचित्रा नागरे, विश्वस्त आणि सचिव प्रा.स्वाती एम. चाटे, विश्वस्त आणि खजिनदार डॉ.सुनील के. कराड, विश्वस्त आणि उपाध्यक्ष प्रा.ज्योती ढाकणे यांची विशेष उपस्थिती होते अशी माहिती संस्थेचे कुलसचिव डॉ रत्नदीप जोशी यांनी दिली. तसेच हा कार्यक्रम 80 हजार विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून पाहता आला. सर्व विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.