पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पांडूरंग परिवाराचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भंडीशेगाव येथील पांडुरंग परिवाराच्या वतीने “कर्मयोगी मॅरेथॉन २०२५” चे आयोजन ड्रीम गार्डन भंडीशेगाव येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात निसर्गातील नैसर्गिक स्त्रोत – नद्या व झाडांचे संवर्धन करण्याची शपथ घेऊन झाली. ग्रामीण भागातील ही पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा ठरली. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आरोग्य जपण्यासाठी प्रेरणा घेतली. विशेष म्हणजे, या मॅरेथॉनचे स्थळ असलेले ड्रीम गार्डन हे तब्बल 42 एकरांमध्ये पसरलेले असून त्यात 20,000 हून अधिक झाडे लावलेली आहेत. गावकऱ्यांनी या झाडांचे संगोपन व संवर्धन मनापासून केले आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. नियमित व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रसन्न राहते आणि आयुष्य अधिक निरोगी होते. या मॅरेथॉनमधून व्यायामाचे महत्त्व प्रत्येकाला पटले. सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो ज्यांनी इतका सुंदर उपक्रम राबविला. तसेच सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना आणि विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
हा उपक्रम समाजातील सर्व घटकांना आरोग्याबद्दल जागरूक करण्यासाठी व प्रबोधन घडवण्यासाठी खरोखरच उपयुक्त ठरला.अशी माहिती तानाजी वाघमोडे यांनी दिली.