पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पोलीस संकुल शहर पोलीस स्टेशन समोर पंढरपूर या ठिकाणी आगामी होणारे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त गणेश मंडळाचे पदाधिकारी व ईद-ए-मिलाचे पदाधिकारी तसेच ग्रामीण भागातील पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
या बैठकीसाठी पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन इथापे तसेच तहसीलदार सचिन लंगुटे व नूतन डिवायएसपी प्रशांत डगळे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी रेखा घनवट तसेच ग्रामीण भागातील पोलीस पाटील व ग्रामीण भागातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व ईद-ए-मिलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीच्या समारोपानंतर नूतन डीवायएसपी प्रशांत डगळे यांची शेळवेचे पोलीस पाटील एडवोकेट नवनाथ पाटील धोंडेवाडीचे पोलीस पाटील नितीन देठे पाटील तसेच पिराची कुरोलीचे पोलीस पाटील शरद कौलगे पाटील यांनी भेट घेऊन आगामी गावातील गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद याविषयी चर्चा केली .