शेळगी प्रतिनिधी तेज न्यूज
शेळगी परिसरातील सर्व सदभक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की सन्मित्र नगर शेळगी येथील श्री.सिद्धीविनायक देवस्थानच्या वतीने वार बुधवार २७ ऑगस्ट २०२५ ते शनिवार ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत अकरा दिवस पहाटे ५:३० ते ६:३० पर्यंत राजोपचार महापूजा, सकाळी ६:३० ते ९:०० वाजेपर्यंत अकरा दिवस गणेश यागाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वार बुधवार २७ ऑगस्ट रोजी पुष्पालंकार,गुरुवार २८ रक्तचंदनलेपन,शुक्रवार २९ दूर्वालंकार,शनिवार ३० तिरंगा अलंकार,रविवार ३१ हरिद्रालेपन,सोमवार १ सप्टेंबर भाजीपाला अलंकार,मंगळवार २ भस्मलेपन, बुधवार ३ रोजी विविध फळालंकार,गुरुवार ४ रोजी ५६ भोग शुक्रवार 5 रिद्धी-सिद्धी अलंकार व शनिवार 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी राजोपचार महापूजेनंतर ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री.श्री.श्री 1008 जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात गणेशयाग पूर्णाहूती होईल.नंतर महाप्रसाची सोय करण्यात आलेली आहे.
सर्व पूजाविधी वेदमूर्ती ईश्वर शास्त्री होळीमठ यांच्या वैदिकत्त्वाखाली, देवस्थान ट्रस्ट व सन्मित्र नगरातील सर्व भक्तगणांच्या बहुमोल सहकार्याने संपन्न होत आहे. तरी शेळगी परिसरातील,सन्मित्र नगरातील,गणेशभक्तगणांनी या विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचा तन् मन धनाने लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धीविनायक देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.