पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुरोगामी विचाराचे दैनिक एकमत सोलापूर आवृत्तीच्या ३४ व्या वर्धापन दिन सोहळा शनिवारी सोलापूर येथील आबासाहेब किल्लेदार सांस्कृतिक भवन येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना कृतज्ञता सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
लोकसेवेच्या भावनेतून राजकारणात यशस्वी वाटचाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचा मान्यवरांच्या हस्ते राजकीय कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते माजी आमदार धनाजी साठे, संपादक मंगेश डोंगरजकर, चेतन नरोटे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. वैजिनाथ कुंभार, मीनल साठे, शोभा मोरे, डॉ. श्रद्धा जवंजाळ, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, अल्ताफ शेख, सयाजी झुंजार, विक्रम खेलबुडे, सोलापूर आवृत्तीप्रमुख संजय येऊलकर, पंढरपूर तालुका प्रतिनिधी अपराजित सर्वगोड उपस्थित होते.
शिक्षणातून प्रगतीकडे वाटचाल करून सुजाण नागरिक बनवून देशसेवा करण्याची आवड निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहन देऊन परीक्षेत यश संपादन केलेल्या नूतन अधिकाऱ्यांना सन्मानित करून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. यासाठी प्रयत्न करणारे नागेश फाटे हे लोकसेवेच्या भावनेतून ४० वर्ष राजकारणात सक्रिय आहेत.
सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, समस्या राजकारणाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांसमोर मांडून लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचे आहे. ही लोकसेवेची भावना मनात ठेवून नागेश फाटे यांनी राजकारणात कामाला सुरुवात केली होती. माजी आमदार स्व. औदुंबरअण्णा पाटील, स्व. वसंतराव काळे, स्व. आमदार भारतनाना भालके यांच्याकडून तालुक्याच्या राजकारणात फाटे यांना मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली. सुरुवातीला गादेगाव ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पडली .
यादरम्यान काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीसपद तसेच काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी त्यांनी सांभाळली. सुरुवातीपासूनच त्यांना सहकार शिरोमणी स्वर्गीय वसंतराव काळे यांचे सहकार्य लाभले.
सध्या नागेश फाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहत आहेत.