पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जैनवाडी ता पंढरपूर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलंगीत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज अंतर्गत ग्रामीण जगता कार्यरत अनुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बँक प्रस्ताव तयार करण्यात या पद्धती या विषयावर मार्गदर्शन क्षेत्राचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या दस्तऐवजांची माहिती बँकेकडून अपेक्षित कागदपत्रांची पूर्तता व्यावसायिक प्रकल्प अहवाल तयार करण्याची पद्धत तसेच बँक कर्ज मंजुरी प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती कर्जाचे देण्यात आले व घेतलेल्या परतफेडीसाठी ची प्रक्रिया सांगण्यात आली व घेतलेल्या कर्जाचे वेळेत परतफेड केल्यानंतर शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीची माहिती देण्यात आली तसेच शेतकऱ्यांनी साव कारांकडून कर्ज न घेता बँक म्हणून कर्ज घेण्याची आव्हान केले कार्यक्रमांमध्ये कृषी दुतांनी विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याचे महत्त्व स्पष्ट केले स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी यशराज दळवे ,अमित जगदाळे ,प्रथमेश करे ,प्रशिक साबळे , सुयश साखरे ,सोनू वाडे, संकल्प शिराळकर ,ऋषिकेश गिराम ,ज्योतीराम ढवळे आणि ग्रामस्थ यांना उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाकडून चे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील आणि रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलवडे (कार्यक्रम समन्वयक) एस एम एकतपुरे आणि (कार्यक्रम अधिकारी) प्रा एम.एम चंदनकर व तसेच विषय तज्ञ प्रा एस व्ही तरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.