वाडी कुरोली प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे महाविद्यालय, वाडीकुरोली येथे शाश्वत शेती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आप्पासाहेब गुंड (उपजिलाधिकारी) , खरात सर ( कृषी सेवक ) समाधान दादा काळे( राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष) , प्राचार्य कुलकर्णी व तसेच शिक्षक कर्मचारी , शेतकरी उपस्थित होते.
शाश्वत शेती दिनाचे महत्त्व
शाश्वत शेती दिन हा दिवस पर्यावरणपूरक, संसाधनांचा योग्य वापर करणारी आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित शेती पद्धती अंगीकारण्याचा संदेश देणारा आहे. आजच्या काळात रासायनिक खतांचा अतिरेक, पाणी व जमिनीचा अपव्यय, हवामान बदल यामुळे शेतीवर मोठा ताण येत आहे. अशा परिस्थितीत शाश्वत शेती हीच एकमेव पर्याय आहे जी नैसर्गिक साधनसंपत्ती जपून, सेंद्रिय शेती, पीक फेरपालट, मिश्रपीक, पाण्याचा मितव्ययी वापर अशा तंत्रांचा अवलंब करते. या दिवशी शेतकऱ्यांना पर्यावरणाशी सुसंगत शेतीचे महत्त्व समजावून देऊन, उत्पादनवाढीसोबत मातीची सुपीकता व जैवविविधता टिकवून ठेवण्याचा संदेश दिला जातो. त्यामुळे शाश्वत शेती दिन हा केवळ शेतीबाबत जागृती करणारा नसून, शेतकरी आणि पर्यावरण दोन्हींच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य . आर जी. नलवडे,प्रा. एस.एम.एकतपुरे कार्यक्रम समन्वयक अधिकारी प्रा. एम एम चंदनकर कार्यक्रम अधिकारी एच व्ही कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिकन्या श्रुती पाटोळे भोईटे योगिता, जगदाळे सानिका , शिखरे प्रतीक्षा ,कहाकर साक्षी ,रेड्डी रोहिणी,देशमुख प्रणोती ,घुले तनुजा , यांनी महत्त्व पटावून दिले