लातूर प्रतिनिधी तेज न्यूज
काव्ययोग काव्य संस्था पुणे आयोजित गणेशोत्सवानिमित्त विघ्नहर्ता काव्योत्सव लातूर पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन २०२५ आयोजित करण्यात आले आहे.
ह्या कवी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ सुप्रसिद्ध कवी ॲड.विजय कुमार कस्तुरे, कार्यक्रम अध्यक्ष डॉ.एम.आर.पाटील रॉयल एज्युकेशन सोसायटी लातूर,प्रमाण पाहुणे दत्ता घारगे मुख्याध्यापक शारदा इंटरनॅशनल स्कूल लातूर,प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कथाकार बबन महामुनी, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या विघ्नहर्ता काव्योत्सव मध्ये १०० कवी सहभाग घेणार आहेत.मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन,पुरस्कार वितरण तसेच विविध राज्यातून आलेल्या कवींचे राज्यस्तरीय कवी संमेलन पार पडणार आहेत.या संंपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन काव्ययोग काव्य संस्थेचे लातूर जिल्हा अध्यक्ष अजय कुमार वंगे , लातूर महिलाध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा गंगणे , लातूर जिल्हा संघटक डॉ.शंकर चामे, कवयित्री अस्मिता तिगोटे,काव्ययोग काव्य संस्थेचे सचिव तुषार पालखे,छाया कांबळे मॅडम,काव्ययोग काव्य संस्था अध्यक्ष योगेश हरणे, उपाध्यक्ष गौरव पुंडे,श्रीराम घडे,प्रमोद सूर्यवंशी आदी सदस्यांनी नियोजन केले आहे.
विघ्नहर्ता काव्योत्सव दिनांक २४ ऑगस्ट २५ रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत cocsit collage रेणुका नगर लातूर येथे पार पडणार आहे.