मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
एक राखी सुखाची...भारतीयांच्या प्रेमाची हि उक्ती घेऊन दरवर्षी गांधी बाल मंदिर कुर्ला मुंबई या शाळेतील विद्यार्थ्यांकडून स्वहस्ते राखी बनवून ती सीमेवरील भारतीय जवानांना सुपुर्द करण्यात येते.
यंदाही कारगील व पठाणकोट येथील जवानांना शाळेतील तीन महाराष्ट्र बटालियन आर्मी च्या वतीने शुभेच्छा संदेश व राख्या पाठविण्यात आल्याचे शाळेचे एन सी सी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ यांनी सांगितले.जवान आपापल्या घरापासून कोसो दूर राहून भारतीयांचे रक्षण डोळ्यांत तेल घालून करीत असतात.अनेक सण उत्सवांपासून दूर राहतात.
अशावेळी त्यांचा हौसला अधिक बुलंद व्हायला हवा या प्रामाणिक उद्देशाने आम्ही दरवर्षी जवानांना राख्या पाठवतो असे शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ व पर्यवेक्षक रवींद्र खोंडे यांनी सांगितले. स्वतः बनविलेल्या राख्या भारतीय जवानांना धाडल्याचे विधार्थी आणि पालक देखील खुश होते.