पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील श्री संत नामदेव महाराजांच्या स्मारकास राज्य शासनाच्या वतीने मंजूर झालेले आहे. ते स्मारक उभे करण्यासाठी नासप, केशव राज संस्था यांच्या वतीने प्रयत्न केले जातील असे मत केशवराव संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी व्यक्त केले.
ते पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे आले असता त्यांचे स्वागत सकल मराठा समाजाचे नेते धैर्यसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते तेज न्यूजशी बोलत होते.
यावेळी आंबेकर म्हणाले, की श्री संत नामदेव महाराज यांच्या स्मारकासाठी वेळोवेळी संबंधित मुख्यमंत्री, मंत्री महोदय, शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन विविध ठराव संमत करून राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नासपने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे स्मारक बांधण्यासाठी नासप नेहमीच आग्रही राहिली आहे.नासपचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुनिल पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन तात्काळ श्री संत नामदेव महाराज स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करावा असे निवेदन देण्यात आले आहे.असे ही आंबेकर यांनी सांगितले.
यावेळी तेज न्यूज परिवाराच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांचे आभार मानण्यात आले.

