सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
वंचित समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या यशवंत संघर्ष सेना या सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हा सचिवपदी संजय वसंत निंबाळकर (रा. दसूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
ही नेमणूक यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कुंहाडे, प्रदेश सचिव अमित माजगडे, तसेच प्रदेश उपाध्यक्ष अनिल दादा रांजडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
संघटनेतर्फे जारी करण्यात आलेल्या नेमणूक पत्रात नमूद केले आहे की, निंबाळकर हे आपल्या पदाचा न्याय देत संघटनेच्या वृद्धीसाठी व समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीबद्दल संजय निंबाळकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.