इटॉन इंडिया इनोव्हेशन सेंटर मध्ये निवड, मिळाले ९ लाखांचे पॅकेज.
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील धनश्री नाईकनवरे या माजी विद्यार्थिनीची इटॉन इंडिया इनोव्हेशन सेंटर, पुणे या नामांकीत कंपनीमध्ये मुलाखती मधून निवड होऊन ९ लाखांचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
पुणे येथील इटॉन इंडिया इनोव्हेशन सेंटर ही एक ऊर्जा व्यवस्थापन कंपनी आहे जी विद्युतीकरण व डिजिटलीकरणाद्वारे जगभरातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व पर्यावरण संरक्षणाचे काम करते. या कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून धनश्री नाईकनवरे या विद्यार्थिनीला तब्बल ९ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
दर वर्षी प्रमाणेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ही कर्मयोगीने प्लेसमेंट क्षेत्रामद्धे आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे टेक्निकल, ऍप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे ट्रेनिंग हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी ठरले. तसेच इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशनचे विभाग प्रमुख डॉ. एस एम लंबे यांच्या मार्गदर्शनामधून शैक्षणिक वर्षात इ अँड टी सी विभागामध्ये जे वर्कशॉप, सेमिनार व टेक्निकल इव्हेंट्स आयोजित केले गेले त्यामधून मिळालेल्या ज्ञानाचा विशेष उपयोग झाला असल्याचे तिने आवर्जून सांगीतले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे , डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक, विद्यासागर जगताप, प्रा. सुशील कुलकर्णी, प्रा.दत्तात्रय चौगुले, प्रा. योगेश माने व इतर सर्व प्राध्यापक यांनी धनश्री नाईकनवरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.