भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील पहिली चार्टर्ड अकाऊंट अंकिता आनंदा लोले हिने जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या सी ए च्या परीक्षेत यश मिळवले आहे.
त्याबद्द्ल अंकिता आनंदा लोले हिचा सत्कार युनियन बँक ऑफ इंडिया भाळवणी चे शाखाधिकारी बालाजी हारके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँकेचे कृषि अधिकारी विकास ,आनंद देशपांडे, वडील आनंदा लोले,आई राजश्री लोले,प्राची प्रशांत माळवदे व बापू वाघमारे, ओंकार माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बालाजी हारके म्हणाले की ग्रामीण भागातील मुलींनी हे यश मिळवणे म्हणजे मोठे यश आहे. सी ए च्या परीक्षेत यश मिळविल्या बद्दल अंकिताचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी अंकिता लोले म्हणाली की विद्यार्थ्यांनी कॉमर्स कडे लक्ष दिले पाहिजे. या क्षेत्रात ही अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.पतपेढी,बँका, कंपनी,व्यवसाय येथे नोकरीची संधी उपलब्ध होत आहेत.माझा तेज न्यूज परिवाराने सत्कार केला. त्याबद्द्ल मी मनपूर्वक आभारी आहे.
यावेळी प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.

