पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने निरीक्षक नेमण्यात आले असून पक्ष वाढीसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन सातारा जिल्ह्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी पक्षाचे निष्ठावान प्रदेशचे पदाधिकारी नागेश फाटे यांच्यावर देण्यात आल्याने सर्व स्तरातील मान्यवर मंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी बोलताना नागेश फाटे म्हणाले की पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पडेन असा विश्वास वरिष्ठ नेत्यांना देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, आमदार नारायण पाटील, आमदार उत्तम जानकर, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, कार्याध्यक्ष रवी पाटील यांच्यासह पक्षाच्या नेते मंडळींचे आभार मानले.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, स्थानिक नेतृत्व आणि वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने पक्ष वाढीचे काम केल्याने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
पुढील काळात सातारा जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक स्थिती, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेणे.स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना आणि अनुभव जाणून घेणे.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची ताकद वाढवणे आणि रणनीती आखणे. स्थानिक पातळीवरील मतभेद किंवा अंतर्गत प्रश्न सोडवून एकजूट राखणे. पक्षाच्या स्थानिक परिस्थितीचा, संघटनात्मक बांधणीचा आणि कार्यकर्त्यांच्या तयारीचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना सादर करणे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा तळागाळात प्रसार करण्याचा निर्धार केला असल्याचे फाटे यांनी माध्यमांसमोर सांगितले.

