भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी तालुका पंढरपूर येथे सन 2025 26 या शैक्षणिक वर्षातील गुरुकुल शिक्षक पालक विद्यार्थी सहविचार सभा संपन्न झाली.
सदर सहविचार सभेमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. गुरुकुल प्रमुख रणजीत दडस यांनी गुरुकुल उपक्रमांतर्गत वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची उपस्थित पालकांना माहिती दिली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक के डी शिंदे यांनी बोलताना सांगितले की पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांची प्रगती निश्चित करता येईल.विद्यालयाचा भौतिक व गुणात्मक विकास करण्यासाठी पालकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
पालक मनोगत मधून नागने , राहुल हातगिने यांनी शिक्षक करत असलेल्या कामाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले.अनेक पालकांनी सूचना मांडल्या त्यावर सकारात्मक चर्चा झाली.
पालक मेळाव्यासाठी हरिभाऊ शिंदे ,सरपंच रणजीत जाधव , सीताराम माने,प्रशांत माळवदे व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन भारत विधाते यांनी व आभार एस एच शिंदे यांनी मानले.
यावेळी विद्यार्थ्यांना संख्येच्या अनुसार टॉयलेट बाथरूम लवकरात लवकर बांधण्याविषयी पालकांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत