पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले तेलंगवाडी, शेटफळ, ता.मोहोळ येथील अनुकूल आनंद थोरात, अकलुज येथील कु.प्रतिक्षा दत्तात्रय पाटील, भाळवणी, येथील कु.संध्या धनाजी पाटील, उंब्रज, ता.कराड, जि.सातारा येथील कु.सृष्टी रमेश सोनवणे, एखतपूर, ता.सांगोला येथील वसूधा सज्जन नवले या विदयार्थ्यांची उमास इंडिया प्रायव्हेट लिमीटेड पुणे येथे निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन इंजिनियरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
उमास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग क्षेत्रात कार्यरत असून, मोठ्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत सेवा प्रदान करते. ही कंपनी मोस्ट नावाच्या सॉफ्टवेअर द्वारे, मनुष्यबळ योग्य प्रकारे वापरून कंपनीचे उत्पादन खर्च कमी करण्यास मदत करते. या कंपनीचे मालक हे पंढरपूर वासी अशोक बडवे आहेत. या कंपनीची वार्षिक उलाढाल १० कोटी रुपये पेक्षा जास्त असुन हि कंपनी परदेशातील श्रीलंका, भूतान, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशात सेवा प्रदान करत आहे.
या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन इंजिनियरींग, मेकॅनिकल इत्यादी शाखांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत आणि वैयक्तिक संवाद अशा टप्प्यांतून ही निवड प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्य, तयारी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही संधी मिळवली.
"विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या आधारे मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे," असे महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. यशवंत पवार, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा.वैभव गोडसे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. हे यश अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.