मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
राज्यातील शाळांमध्ये यापुढे पहिलीपासून एन सी सी शिकविण्यात यावे असे आदेश नुकतेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले असून हा निर्णय चांगला आहे.सध्या अनेक शाळांत इयत्ता आठवी ते दहावी तर कॉलेजमध्ये अकरावी ते पंधरावीचें विधार्थी एन सी सी शिकत आहे.
लहान वयातच एन सी सी ची ओळख झाली तर पर्यायाने आपल्या देशात अनेक नवीन सैनिक तयार होतील की जे पुढे जाऊन सैन्यात भरती होऊन देशसेवा करू शकतील.काही आपत्कालीन परिस्थितीत देखील नागरिकांना स्वसंरक्षण करता यावे म्हणून अनेक ठिकाणी सिव्हिल डिफेन्स चे शर्ट कोर्सेस घेतले जातात.एन सी सी मुळे नक्कीच विद्यार्थ्याना आपल्या देशाबद्दल अधिक आदर निर्माण होईल.
राज्यात एन सी सी ची केंद्र वाढायला हवीत.केवळ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे रोजी कवायती सादर करून चालणार नाहीत तर महिन्यातून किमान तीन चार दिवस कवायती व्हायला हव्यात असून प्रत्येकाने अपडेटेड राहायला हवे.युद्धजन्य परिस्थितीत कोणत्याही देशाची ओळख होत असते.सर्वच परिस्थितीत आपण एक पाऊल पुढे असायला हवे.तसेच देशाचे रक्षण करणे हे केवळ सैनिकांचे काम नसून प्रत्येक भारतीय व्यक्तीचे ते आद्य कर्तव्यच आहे.तेव्हा शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतलेला या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करायला हवे.