अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
तांदुळवाडी ता. माळशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यक्रमांतर्गत हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी दिना निमित्ताने तांदुळवाडी येथे 'शाश्वत शेती विकास' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमा वेळी कृषीदुतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .नैसर्गिक संसाधनांचा-जसे की पाणी, माती, आणि जैवविविधता- विचारपूर्वक आणि योग्य पद्धतीने वापर करणे, जेणेकरून त्यांचे दीर्घकाळ संवर्धन होईल. शाश्वत शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणे आवश्यक आहे. त्यामुळे, त्यांना चांगले उत्पन्न मिळावे आणि त्यांचे जीवनमान सुधारावे. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर कमी केल्यामुळे, माती, पाणी आणि हवा यांची गुणवत्ता सुधारते. सेंद्रिय खतांचा वापर केल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते, जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण तयार होते आणि जमिनीची सुपीकता वाढते.जलधारण क्षमता वाढते.अशी माहिती कृषीदुत अनिकेत चव्हाण, सुयश बागल, अविराज पवार, संदेश मोरे , महेश गंगथडे, प्रथमेश चव्हाण, विवेक थोरात,श्रीधर मारकड यांनी शेतकऱ्यांना दिली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलावडे,प्रा.एस.एम.एकतपुरे(कार्यक्रम समन्वयक), प्रा.एम.एम.चंदनकर ( कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमावेळी तांदुळवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.