पंढरपूर प्रतिनिधी
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पंढरपूर शाखेतील सहाय्यक शाखा प्रबंधक अश्विनी बिराजदार व विकास अधिकारी बी एस चौगुले यांच्या हस्ते एलआयसीतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रशांत माळवदे यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी अश्विनी बिराजदार म्हणाल्या की एलआयसीची 20 जानेवारी 2025 रोजी एकाच दिवशी 588107 विमा पॉलिसी करून ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. ही उत्कृष्ट अशी कामगिरी आमच्या विमा प्रतिनिधींनी केलेली आहे त्यामुळे एलआयसी कडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी चौगुले म्हणाले की ग्रामीण भागातील नागरिकांनी एलआयसीचा विमा घेऊन आपली व आपल्या परिवाराची सुरक्षितता करून भविष्यातील अडीअडचणी कमी करण्यासाठी बचत ही करून ठेवली पाहिजे. एलआयसी विमा ही काळाची गरज बनली आहे.यावेळी विमा प्रतिनिधी रामचंद्र वाघमोडे, थोरबोले,प्रणव पवार हे उपस्थित होते.
हा सन्मान मिळाल्या बद्दल विमाधारक,मित्र परिवार व ग्रामस्थ यांचेकडून माळवदे यांचे अभिनंदन केले जात आहे.