पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग व आयईईई विद्यार्थी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने "ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये प्रकल्प व्यवस्थापन: साधने, तंत्रे आणि केस स्टडीज" या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या व्याख्यानाचे आयोजन डॉ. के. जे. करांडे, महाविदयालयाचे प्राचार्य व आयईईई विद्यार्थी शाखा मार्गदर्शक, डॉ. एस. जी. कुलकर्णी- उपप्राचार्य व आयआयसी अध्यक्ष, डॉ. के. शिवशंकर – विभागप्रमुख, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व आयईईई विद्यार्थी शाखा सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. जरपाला शिवा नाईक (Senior Engineer, GE Vernova, चेन्नई) यांनी online मार्गदर्शन केले. त्यांना १० वर्षांहून अधिक अनुभव असून, त्यांनी ३ वर्षे अध्यापन, ५ वर्षे संशोधन आणि ३ वर्षे औद्योगिक क्षेत्रात कार्य केले आहे. श्री. नाईक यांनी प्रकल्प व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांवर, ऊर्जा संचालन व नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक साधनांवर आणि उद्योगातील वास्तव केस स्टडीजवर आधारित उत्कृष्ट व माहितीपूर्ण सादरीकरण केले. त्यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना ऊर्जा पायाभूत क्षेत्रातील प्रकल्प व्यवस्थापनाची व्यावहारिक समज प्राप्त झाली.
या कार्यक्रमास इलेक्ट्रिकल विभागातील सर्व प्राध्यापक व अंतिम वर्ष बी.टेक. (इलेक्ट्रिकल) चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या online झालेल्या सत्राने विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रातील उद्योगस्नेही कौशल्ये आत्मसात करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली.