सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
माझ्या जीवनात गुरूमाऊलींची सेवा करण्याचे भाग्य माझ्या सहित सर्व शिक्षक बंधू भगिनींना मिळाल्याने जीवन सार्थकी लागले असे प्रतिपादन ए.जी.कुंभार यांनी केले.
श्री बृहन्मठ होटगीच्या संस्थेच्या वतीने ए.जी.कुंभार सर यांना श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डाॅ.मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृतहस्ते श्री होटगीश्वर चिंतामणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रित्यर्थ बृहन्मठ होटगी संस्थेच्या सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींच्या ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी सत्कार उत्तर देताना ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिधद रोडगीकर, राजकुमार भोरे,सुभाष धुमशेट्टी,उकरंडे मॅडम,मठपती मॅडम, रवि शंकर कुंभार, वैशाली कुंभार उपस्थित होते.
यावेळी श्री बृहन्मठ होटगीच्या संस्थेच्या सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने जेष्ठ शिक्षक शिवशररण बिराजदार, सोमनिंग कोष्टी यांच्या शुभ हस्ते शाल,पुष्प गुच्छ, हार व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रोडगीकर, भोरे, धुमशेट्टी.मठपती मॅडम मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यल्लप्पा व्हनकडे सर,व आभार नेताजीचे मठपती सर यांनी केले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.नंतर फोटोसेशन झाले. याप्रसंगी सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.