पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे २०१५ बॅचचे विद्यार्थी अनिल अरुण टेकळे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. सध्या ते इनोव्हा सोलूशनस या आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत सिनियर सॉप्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत.
अनिल यांना नुकतीच अमेरिकेतील टेम्पा, फलोरीडा येथे नवीन नोकरीची संधी मिळाली असून, त्यांचे वार्षिक पॅकेज ₹80 लाख ( डॉलर 92,000) इतके आहे. ही कामगिरी त्यांच्या मेहनत, कौशल्य आणि सातत्याचा परिपाक आहे.
सिंहगड महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर, अनिल यांनी विविध तांत्रिक कौशल्ये आत्मसात करत आपली कारकीर्द घडवली. आपल्या अथक प्रयत्नांमुळे त्यांनी हे यश संपादन केले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.
सिंहगड महाविद्यालयास त्यांच्या या यशाचा अभिमान वाटतो. सिंहगड परिवाराकडून अनिल व त्यांच्या पत्नी महाविदयालयाची माजी विदयार्थीनी सौ. स्वप्ना गोड यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, ट्रेनींग प्लेसमेंट ऑफीसर डॉ.समीर कटेकर, डॉ. अनिल निकम, डॉ.संपत देशमुख यांनी त्यांच्या परिवारास पुष्पगुच्छ देऊन पुढील कारकिर्दिस शुभकामना दिल्या.