म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
शुभम भारत गॅस एजन्सी, म्हसवड तर्फे सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की,गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी इ-के.वाय.सी करणे अनिवार्य आहे.ज्यांनी अद्याप इ-के.वाय.सी केलेले नाही, त्यांनी तातडीने करून घ्यावे. अन्यथा सिलेंडर मिळण्यात अडचण येऊ शकते.
🔹 ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी एजन्सीची अधिकृत गाडी द्वारे देखील इ-के.वाय.सी करण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना थेट मुख्य कार्यालय, म्हसवड येथे येणे बंधनकारक राहणार नाही.
इ-के.वाय.सी साठी आवश्यक कागदपत्रे:
• आधार कार्ड
• गॅस पुस्तक
• स्वतः व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक
सर्व ग्राहकांनी तातडीने सहकार्य करून इ-के.वाय.सी पूर्ण करावी, असे आवाहन शुभम भारत गॅस एजन्सी, म्हसवड तर्फे करण्यात आले आहे.