पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या नूतन प्रभारी अधिकारी श्रीमती रेखा घनवट यांनी नुकताच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटलांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत धनवट यांनी प्रत्येक पोलीस पाटलाकडून गावातील गोपनीय माहिती घेतली तसेच त्यांच्याशी गावाविषयी माहिती घेऊन चर्चा केली तसेच पोलीस पाटलांकडून माहिती घेऊन संपर्कात राहण्याचे आवाहन केले. या बैठकीसाठी ग्रामीण पोलीस स्टेशन पीएसआय वीरसेन पाटील, पीएसआय संतोष जगताप ,पीएसआय सुप्रिया यादव पीएसआय ज्योती बनवाड तसेच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावचे पोलीस पाटील शेळवे खेड भाळवणी धोंडेवाडी पिराची कुरोली सुपली वाखरी कौठळी जैनवाडी उपरी तिसंगी सोनके कोर्टी उंबरगाव लोणारवाडी गार्डी पळशी तसेच इतर पोलीस पाटील उपस्थित होते.
यावेळी पोलीस पाटील संघटने कडून पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या नूतन प्रभारी रेखा घनवट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेळवे गावचे पोलीस पाटील एडवोकेट नवनाथ पाटील धोंडेवाडी गावचे पोलीस पाटील नितीन देठे पाटील व पिराची कुरोली शरद पाटील व इतर पोलीस पाटील उपस्थित होते.