तांदुळवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दुतांकडून ऊस बीज लागवडीपूर्वी ऊसाचे बेणे (टुकडे) बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या द्रावणात बुडवून घ्यावे. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.प्रात्यक्षिकांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी बाविस्टीन बुरशीनाशकाचा वापर करून ऊसाच्या सेट्सवरील बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळवता येते अशी माहिती दिली. बियाणे प्रक्रिया करताना १ लिटर पाण्यात २ ग्रॅम बाविस्टीन ( बुरशीनाशक )मिसळून ऊसाचे सेट्स १०ते १५ मिनिटे त्या द्रावणात बुडवून ठेवण्यात आले . यावेळी बीज प्रक्रिया केल्यामुळे ऊसाच्या कांड्या भोवती जैविक व रासायनिक बुरशीनाशकांचे सुरक्षित कवच तयार होते. त्यामुळे जमिनीतून किंवा बियाणं मधून होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत होते.त्याचबरोबर रोगांचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे उत्पन्नात ही भर पडते याची माहिती शेतकऱ्यांना दिली.
या कार्यक्रमा वेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना ऊस बेणे प्रक्रिया यावर माहिती दिली आणि कशाप्रकारे ऊस पिकातील रोगांवर नियंत्रण करावे . व आवश्यकतेनुसार, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करावा.पिकाच्या वाढीच्या अवस्थेत आवश्यकतेनुसार खुरपणी आणि बांधणी करावी. याची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील ,रत्नाई कृषी महाविद्यालयाचे अकलूज प्राचार्य .आर .जी . नलावडे ,प्रा. एस. एम. एकतपुरे ,प्रा. एम .एम. चंदनकर,विषय तज्ञ डॉ. डी.एस.ठवरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषीदूत अविराज पवार, श्रीधर मारकड, सुयश बागल, संदेश मोरे, अनिकेत चव्हाण, महेश गंगथडे, प्रथमेश चव्हाण, विवेक थोरात यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . हे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी किसन गायकवाड यांच्या शेतामध्ये घेण्यात आले .