सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युती-आघाडीचा निर्णय कार्यकर्त्याशी चर्चा करुन घेतला जाईल असे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगीतले.
राजकारणात परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय कधीही दिशादर्शक ठरत आसतात.तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय योग्य वेळी घ्यावे लागत असतात.
सांगोला नगरपालिका निवडणुकीत शेकापक्षाने भाजपा व मा.दिपक(आबा) साळुंखे पाटील एकत्रीत येत सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवलेली आहे.. तालुक्याचा विकास व लोकांचे प्रश्न सुटावेत या हेतुने आंम्ही एकत्रीत आलो.सांगोला शहराच्या विकासाठी केंद्र व राज्य सरकारचा विकास निधी आणन्यासाठी ही युती -आघाडी केली होती...आमदार बाबासाहेब देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, टिका करणारे टिका करीत असतात.मि मात्र टिका करणे टाळतो प्रसंगी उत्तर मात्र द्यावे लागते.राजकारणात चुकीचे बोलुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण केले जात आसतात,गैरसमज केले जात आसतात आशा वेळेस मला गैरसमज दुर करण्यासाठी पुढे येऊन बोलावे लागते.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कदाचीत आता टिका करणारे सुध्दा सोबत येऊ शकतात.
राजकारणात सकारात्मक महत्वाची असते.निवडणुक काळात टिका ,टिपण्णी,रोष आरोप -प्रत्यारोप विसरून पुढे जाऊन मी तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या समस्यांसाठी मी जास्त वेळ देत असतो.आपला दृष्टीकोन सकारात्मक असेल आणी विकासाचे उद्दिष्ट असेल तर इतरांनी केलेल्या टिकेला लोक महत्त्व देत नसल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
आपला सांगोला तालुका हा राजकीय दृष्ट्या शांततामय तालुका म्हणून ओळखला जातो.स्व.आबासाहेबांनी तालुक्यात शांतता व सर्वधर्म समभाव अबधीत राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.आज ही आंम्ही त्यांच्याच विचाराचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत असतो..निवडणुक काळात जरी एकमेकांवर टिका टिपण्णी केली जात आसली तरी विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आंम्ही एकत्रीत सुध्दा येत असतो तशी सांगोला तालुक्याची परंपरा आहे.स्व.आबासाहेबांनी सुध्दा विकासाच्या दृष्टी कोनाने त्यावेळेस आघाड्या निर्माण करुन विकासाची गंगा तळागाळा पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता..तसाच प्रयत्न आज आंम्ही करीत आहोत शेवटी मतदार संघाचा व जनतेचा विकास महत्वाचा आहे...
येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकीत कोणत्या पक्षाची कोणाबरोबर आघाडी युती होईल हे सध्या सांगता येत नाही.सध्या याबाबत पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे .त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्याशी चर्चा करूनच निवडणुकीचे धोरण ठरवले जाईल.
आगामी निवडणुकीत ही आघाडी अशीच राहील किंवा त्यामध्ये बदल होतील की. एखादा दुसरा पक्ष सुध्दा या मध्ये सामील होऊ शकतो.राजकारणात काहिही घडु शकते.त्यामुळे युती आघाडी याबाबत आत्ताच बोलने योग्य होणार नसल्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सांगीतले तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची भुमीका ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतली जाईल असे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

