पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
8 डिसेंबर 2025 उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे आय सी टि सी/ए. आर. टी.सेटर /समग्र सामाजिक प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्डल मार्च च्या माध्यमातून जागतिक एडस् दिन व सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी रांगोळी व फुलांच्या माध्यमातून आकर्षक रांगोळी काढण्यात आले होती. सन-२०२५ चे ब्रीद वाक्य"अडथळ्यावर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ, नव परिवर्तन घडवू!! हे होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपक धोत्रे यांनी ए आर टी पंढरपूर यांचा देशपातळीवर तृतीय क्रमांक व महाराष्ट्र पातळीवर प्रथम क्रमांक आल्याबद्दल संपूर्ण टीमचे शुभेच्छा पर अभिनंदन केले व असेच टीमवर्क पुढेही चालू राहू द्या. याच्याविषयी एच आय व्ही संसर्गित रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा आपल्या स्तरावर मिळावेत याबद्दल आवाहन केले. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना ए.आर. टी. चे वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी मा. डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी जागतिक पातळीवर एच आय व्ही /एडस् आजाराने जे रुग्ण मृत्युमुखी पडतात त्यांना सदभावना पर श्रध्दांजली कॅन्डल मार्च च्या माध्यमातून अर्पण करण्यात आली . एआरटी औषध प्रणाली, CD4 व Viral Load रक्त चाचणी,व आरोग्य विषयी, आहाराविषयी, गरोदर मातांना मोफत समुपदेशन, व विविध शासकीय योजना इ.सेवा सर्व गरजू रुग्णांना पूर्णपणे मोफत देण्यात येते असे सांगितले.
या कार्यक्रमास मा. प्रशासकीय अधिकारी डॉ. निलेश लांब, डॉ. अविनाश वुईके, डॉ. विनिता कार्यकर्ते, मेट्रन श्रीम. सिंधू लवटे, श्रीम. कुंदा नरूटे, सिस्टर इन्चार्ज श्रीम. रेवती कुलकर्णी, श्रीम. शीतल राऊळे, श्रीम. जयश्री बोबले, श्री. लक्ष्मण खांडेकर, श्री. नितीन पाटील, श्री वरिलाल जाधव,श्री. सुधीर भातलवंडे, श्री. योगिराज विजापुरे, श्रीम. रुपाली चहांदे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पुरुषोत्तम कदम तर आभार प्रदर्शन डॉ. अविनाश वूईके यांनी केले. तसेच कॅन्डल मार्चचे रांगोळी व फुलाची सजावट औषध निर्माण अधिकारी श्रीम. विद्या माने यांनी केली.
हा उपक्रम यशस्वी करण्या करीता बाजीराव नामदे,नागेश देवकर, भगवंत भोसले, दीपक गोरे, युवराज वांगी,संतोष शेंडगे, बाळासाहेब पांढरे, संदीप देशमुख, धनंजय कुंभार, रवी गोरे, आशुतोष भातलवंडे, श्रीम. स्वाती माने, मिनाक्षी कदम,रुपाली देवकर, सुज्ञाता गायकवाड, मेघा चंदनशिवे, किशोर जाधव, विशाल शिंदे इ. ने परिश्रम घेतले.

