पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री संत शिरोमणी नामदेव गाथा 675 संजीवन समाधी सोहळा या निमित्ताने कै. ह .भ .प गुरुवर्य प्र.द.निकते गुरुजी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रेरणेने त्यांचे बंधू पुरूषोत्तम निकते गुरुजी, यांनी गाथा लेखन लिखाणाचा संकल्प केला. आणि तो सिद्धीसही आला .3 11 लोकांनी नामदेव महाराजांचे गाथा लिहिण्याचा आणि त्यांच्या विचारांची धुरा सांभाळण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे .आणि हा महाराष्ट्र साहित्यातील संतांच्या भूमीत अतिशय अलौकिक असा उपक्रम संपन्न झाला.
निकते गुरुजींनी अतिशय नियोजनबद्ध सुसूत्रतेने हा कार्यक्रम ठरवला. विशेष म्हणजे प्रसार माध्यमाचा खूप चांगला उपयोग झाला. आणि आपण काहीही करू शकतो एकत्र येऊ शकतो. हे सिद्ध झाले. या कार्यक्रमा चा उद्देश सफल झालाच. त्यामध्ये विशेष योगदान दिलेले.ह.भ.प.संतोष माळवदकर,सोलापूर,ह. भ .प . निवृत्तीनाथ काकडे. पिंपरी चिंचवड,श्री. प्रकाश उनकुले, चिपळूण,श्री ज्ञानेश्वर सुपेकर. सोलापूर, पत्रकार सूर्यकांत भिसे,ज्ञानेश्वर वडे पंढरपूर,श्री.चंद्रकांत गंगाधर निकते. पंढरपूर,श्री. अजय गंगाधर निकते. पंढरपूर, इत्यादींनी सामाजिक योजना योगदान दिले.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित दिग्गजांची मांदळी होती. त्यामध्ये संत नामदेवरायांचे १७ वे वंशज हभप श्रीगुरू विठ्ठल महाराज नामदास,विठ्ठल रुक्मिणी समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,श्री संत माणकोजीबुबा बोधले यांचे वंशज जयवंत बोधले महाराज ,भागवत मनीषी ओजस्वी प्रखर वक्ता बड़ा रामद्वारा जोधपुर के महन्त अंतर्राष्ट्रीय रामस्नेही स्वामी हरिराम शास्त्री,मा. राजेंद्र पोरे ज्येष्ठ कार्यकर्ते व मुख्य विश्वस्त, ना स प, पुरूषोत्तम गं निकते. न भूतो संत नामदेव गाथा हस्तलेखन मुख्य संकल्पना व आयोजक ,प्रकाश उपकुले, चिपळूण ,संत नामदेव साहित्याचे अभ्यासक व जेष्ठ कार्यकर्ते,मा. सुर्यकांत धटिंगण, नाशिक नामदेव गाथा व्रती. मा. ज्ञानेश्वर सुपेकर माजी व्यवस्थापक विठ्ठल रुक्मिणी समिती. ह.भ.प. संदीप महाराज वैद्य, सोलापूर ,संत नामदेव महाराज फडाचे पायीक,श्रीमती प्रतिभा प्रकाश निकते. संत नामदेव गाथा व्रती ,सौ. मीनल कुडाळकर ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि चांगले पदाधिकारी सर्वांचे उपस्थिती सन्माननीय ठरली.
या कार्यक्रमाची शोभा आणण्यासाठी शंख वादन - सौ निरगुडे ताईंनी केले तसेच,तुतारी वादनाने सर्वांचे स्वागत झाले.,गणेश वंदना - सौ नेहा भोपळे, मलकापूर यांनी खूप छान केले. तसेच मनमोहक असे कथ्थक नृत्य - सारिका चांडवले यांनी सादर केले. सूत्रसंचालन रेखाताई गाडेकर पिंपरी चिंचवड ,आणि रेखाताई हेंद्रे फलटण यांनी केले आणि या कार्यक्रमाची सांगता नामदेव पायरी ते नामदेव मंदिर आणि नगर प्रदक्षिणा ग्रंथदिंडीने संपन्न झाली . पंढरपुरी असे आनंदमय वातावरण पांडुरंग रुक्मिणीच्या आणि भक्त नामदेवांच्या साक्षीने वैकुंठ नगरी पंढरपुरात अशा रीतीने अविस्मरणीय असा कार्यक्रम संपन्न झाला.