इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे तेज न्यूज
कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील सभागृहात इंदापूर तालूका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर यांच्या वतीने देण्यात येणारा विश्वास गौरव २०२५ पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल वालचंदनगर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ् डॉ.वसंत भगवानराव दगडे त्यांच्या सुविद्य पत्नी रीटा दगडे यांना संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु.दहा हजार देवून प्रदान करण्यातआला.यावेळी उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव विरसिंह रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त शंकरराव रणसिंग,माजी कार्यालयीन अधीक्षक शिवाजीराव कदम ,प्रा.डॉ.अशोक काळंगे ,प्राचार्य डॉ.विजय केसकर,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग इ मान्यवर उपस्थित होते. विश्वास गौरव पुरस्कार इंदापूर तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती व पुणे जिल्हा परिषद सदस्य तसेच इंदापूर तालूका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कै. विश्वासराव रणसिंग यांच्या २५ जुलै या जयंती दिवशी समाजातील कार्यसंपन्न व्यक्तीना प्रदान करण्यात येत असल्याचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.दरवर्षी विश्वास पुरस्कार दिला जात असून मातीशी नाळ व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉ वसंत भगवान दगडे यांना सन्मानित करण्याचे सदभाग्य मिळाले असल्याचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले. यावेळी डॉ वसंत दगडे यांनी स्वर्गीय विश्वासराव दादा यांच्या आठवणीना उजाळा दिला.दादानी राजकारणासोबत सामाजिक जाणीव ठेवून केलेल्या कार्याचाआनंद व्यक्त केला. आयुष्यात माणसे जोडणे गरजेचे असल्याची शिक्षण अशिक्षित असणाऱ्या आईने दिली असल्याची आठवण त्यांनी सांगितली. आज या गोष्टींची गरज असल्याचे निरीक्षण ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठाने नोंदवले असल्याचे सांगितले.
.स्वर्गीय विश्वासराव रणसिंग यांच्या जयंती च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन आनंदी रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.एम एस्सी केमिस्ट्री प्रयोगशाळाचे उद्घाटन विश्वस्त कुलदीप हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून महाविद्यालयास ९० लक्ष रु चे बंदिस्त प्रेक्षागृह मंजूर झाले असून त्यांचे भूमीपूजन सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी उपाध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोपे वाटप करण्यात आली.महाविद्यालयाच्या वतीने ५०० रोपे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.संस्था संचलित माध्यमिक विद्यालय तावशी व माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी येथे चित्रकला,निबंधस्पर्धा,वृक्षारोपण,खाऊ वाटप इ उपक्रम घेण्यात आले. विश्वास गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे सन्मानपत्र वाचन प्रा.विद्या गुळीग यांनी केले.प्रास्ताविक प्राचार्य विजय केसकर व आभार प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी व्यक्त केले.निवदेन प्रा.अभिजीत शिंगाडे यांनी केले.
यावेळी,प्रा.प्रशांत शिंदे ,प्रा. सुहास भैरट,प्रा.राजेंद्रकुमार डांगे ,प्रा. विलास बुवा ,प्रा.रामचंद्र पाखरे,प्रा.ज्योत्स्ना गायकवाड ,प्रा.विनायक शिंदे ,प्रा. योगेश खरात ,प्रा. महादेव माळवे,प्रा.सुवर्णा बनसोडे, म्हसोबाची वाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोग , व तावशी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव बागल इ मान्यवर व प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.