शिंपी समाजातील महिलांच्या सुंदर टाळ नृत्याविष्कारासह, ज्येष्ठांचा, गुणवंतांचा गौरव इ. उपक्रम
अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
अकलूज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दि.२३ रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा शिंपी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
पहाटेची श्री विठ्ठल रुक्मिणी आणि नामदेव महाराज यांच्या मूर्तीची महापूजा विजय चांडोले आणि सौ.पुनम चांडोले या उभयंतांच्या हस्ते करण्यात आली.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर अकलूज येथे आयोजित सकाळी 10.30 ते दु. 12.00 या वेळेत युवा कीर्तनकार ह.भ.प.श्री विठ्ठल कंधारे महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले, या कीर्तनातून संत नामदेव महाराज हे आद्य कीर्तनकार असून त्यांनी केलेला कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार यामुळेच मी आज कीर्तन, प्रवचन करू शकतो असे सांगत नामदेवांचे जीवन कार्य, त्यांचे अभंग हे साध्या सोप्या भाषेतून विविध दाखल्यांद्वारे सुश्राव्य अशा कीर्तनातून सांगितले.दुपारी 12.00 वाजता पुष्पवृष्टी करण्यात येऊन महाआरती मा.श्री. पांडुरंगभाऊ देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
675 व्या संजीवन सोहळ्याचे औचित्य साधून शिंपी समाजातील 74 वयोगट पुढील या ज्येष्ठांचा मानाचा फेटा आणि गौरव पत्र संत शिरोमणी नामदेव महाराज ट्रस्ट, अकलूज वतीने अकलूजचे तत्कालीन माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, पांडुरंगभाऊ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे, युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील ,हेमलता चांडोले, दादा मुळे, श्रीनाथ पतंगे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मा. किशोरसिंह माने पाटील म्हणाले की, आज ज्या 22 मातृतुल्य पितृतुल्य अशा 74 वर्षांपुढील ज्येष्ठांना गौरव पत्र प्रदान करून भावी पिढी समोर शिंपी समाजाने एक आदर्श निर्माण केला आहे. संत नामदेवांच्या विचार वाटेवरून जीवनातील इतक्या वर्षांचा प्रवास करून संत विचार शिकवण सदाचार स्वतःमध्ये रुजवून अनुभव कष्ट आणि मूल्यांची जी शिदोरी ज्येष्ठ मंडळींनी उभी केली आहे ती आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरली
आहे. या ज्येष्ठांनी आपल्या कुटुंब सांभाळताना आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहून कुटुंब समाज आणि क्षेत्र या तीनही पातळ्यांवर समर्पण आणि सेवाभावाने समृद्ध केले आहे. त्यांच्या या बाबींची तसेच कुटुंब आणि अन्य क्षेत्रातील कर्तुत्व, नेतृत्व आणि आध्यात्मिक वारसातून सांस्कृतिक मूल्यांची जपणूक लक्षात घेऊन त्यांच्या परी कृतज्ञता ठेवत त्यांचा गौरव करणे हे खरंच कौतुकास्पद आहे असे मत विशद केले.
तसेच यावेळी मा.शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी याप्रसंगी बोलताना, ज्येष्ठ मंडळी हे कुटुंबाचा आधारवड असून त्यांच्याकडून आपल्याला अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्य जपण्याची शिकवण मिळाली आहे तीच त्यांच्या आशीर्वादाने आपण भावी पिढीला देत आहोत आणि ती देणे गरजेचे आहे, कारण या विचारातून आणि योगदानातून कुटुंब आणि समाज या दोघांचीही जडणघडण होणार आहे. त्यासाठी सर्व संतांनी दिलेला अध्यात्मिक वारसा प्रत्येकाने आपल्या मनात आणि अंगात रुजवला पाहिजे व त्या पद्धतीने कृतीशील असले पाहिजे असे मत व्यक्त केले.
माळशिरस तालुक्यातील गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ - दत्तात्रय मुळे, डॉ.श्रीनिवास जामदार, अशोक अंचलकर, सुभाष जवंजाळ, रमेश रेळेकर, बाळासो पोरे, अनिल सोडळ, डॉ.राजकुमार जवंजाळ, गोरखनाना जवंजाळ, मधुकर पोरे, रघुनाथ मुळे, वासुदेव पिसे, सौ.पुष्पावती मुळे, श्रीवल्लभ जामदार, श्रीमती कमल महाडिक, श्रीमती प्रमिला बंगाळे, सौ.रत्नप्रभा धोकटे, नामदेव धोकटे, कालिदास बंगाळे, श्रीमती विजयश्री ढवळे श्रीमती अलका जवंजाळ, रमेश मुळे सन्मान करण्यात आला.
यावेळी कु.वेदश्री पोरे हिने दोन अभंगांवर सुंदर कथ्थक नृत्याविष्कार सादर केला त्यास उपस्थित आणि मनमुराद दाद दिली. या नृत्याविष्काराबद्दल वेदश्री हिचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार मा.श्री. भाग्यवंत नायकुडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सन 2025-26 साठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज महिला मंडळ च्या नुतन अध्यक्षा सौ. रेश्मा बुलबुले, उपाध्यक्षा पदी सौ. कल्याणी दामोदर यांची निवड करण्यात आली.
नामदेव प्रतिष्ठान अकलूज चे 2025-26 साठीचे अध्यक्ष श्री. वैभव जामदार, उपाध्यक्ष पदी सिद्धिविनायक पोरे यांची निवड करण्यात आली.
या सर्व नूतन पदाधिकारी यांचा तसेच युवा कीर्तनकार ह.भ.प.श्री. विठ्ठल कंधारे महाराज तसेच ज्ञानाई गुरुकुल मधील सांप्रदायिक भजनी मंडळाचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सायंकाळी अकलूज शहरामधून टाळ मृदुंग पखवाजाच्या गजरात संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची आकर्षक सजावट केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मधून शोभायात्रा काढण्यात आली, या शोभा यात्रेमध्ये एकसारख्याच लाल रंगाच्या साड्या परिधान करून तीस महिलांनी अभंगांनी भक्ती गीतांवरील सादर केलेला टाळ नृत्याविष्कार दिमाखदार आणि नयनरम्य ठरला.
तर ज्ञानाई गुरुकुल मधील मुलांनी अभंगांवरील केलेला टाळ, मृदुंग पखवाजाच्या गजरातील ठेका व धरलेली पाऊले अत्यंत लोभस आणि प्रेक्षणीय ठरली. शोभायात्रा प्रसंगी लहानांपासून थोरांपर्यंत केलेली वेशभूषा यातील लहानांमध्ये विठ्ठल - वरदराज पोरे, रुक्मिणी - विभावरी दामोदर, संत नामदेव - आदित्य जामदार, संत तुकाराम - अर्णव जवंजाळ, संत जनाबाई - वेदांगी चांडोले, मुक्ताबाई - स्वस्ती जामदार, बाल शिवाजी हेरंब सोडळ आणि तन्मय सोडळ, मोठ्यांमध्ये विठ्ठल- श्री.सुहास मुळे व रूक्मिणी सौ. राधिका सुहास मुळे, संत तुकाराम - महेश पोरे, संत नामदेव - गजानन जवंजाळ, संत चांगदेव - संतोष सटाले, नागा साधू - अध्यक्ष गणेश सटले, झेंडाधारी वारकरी- सुयोग सोडळ, पंजाब मधील बाबाजी नामदेव - श्रीनाथ पतंगे, तसेच बहुतेकांनी वारकरी पेहराव यांच्या वेशभूषेमुळे आणि महिलांनी डोक्यावर घेतलेले कलश आणि तुळस वृंदावन, तसेच सहभागी झालेल्यांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख व पांढरी टोपी यामुळे या शोभायात्रामध्ये आणखीनच सुंदर भर पडली.
शोभायात्रे नंतर रात्री श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आला त्या स्पर्धांमधील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी पाककला स्पर्धा मधील - प्रथम क्रमांक सौ.अर्चना मळवदे, द्वितीय क्रमांक विभागून - सौ. सौ.कल्पना जवंजाळ, सौ.दिव्या रेळेकर, तृतीय क्रमांक विभागून - सौ. अनुश्री सोडळ, सौ. प्रियांका फुटाणे, उतेजनार्थ - सौ. वैशाली पोरे, सौ.उज्वला जामदार,
फळभाज्यांपासून सजावट करणे या स्पर्धेमधील
प्रथम क्रमांक सौ.कल्पना जवंजाळ, द्वितीय सौ.प्रियांका फुटाणे, तृतीय सौ.पूनम चांडोले, पुष्पगुच्छ/बुके बनवणे स्पर्धा मधील - प्रथम सौ.कल्पना जवंजाळ, द्वितीय सौ.पूनम चांडोले, तृतीय सौ.भाग्यश्री ढवळे तसेच सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सौ.लीलावती जामदार, सौ.सुनीता सटाले, सौ.रेश्मा बुलबुले, सौ.तृप्ती जामदार, सौ.सारिका जामदार, सौ.अश्विनी जामदार यांना बक्षीस हे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या स्पर्धांसाठी सौ.अनुप्रिया जवंजाळ, ॲड.सौ.ऋता अंचलकर, सौ. हेमलता चांडोले, सौ.चैताली जामदार, सौ.मनिषा ढवळे, सौ.लीना मुळे, सौ.वृषाली जवंजाळ, सौ.प्रियांका जामदार, सौ. कल्याणी दामोदर, सौ.रेश्मा बुलबुले आदींनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी चालू वर्षी 10 वी आणि 12 वी मध्ये उज्वल यश मिळवलेल्या हर्षल ढेरे, अंकिता जामदार, गौरांग जामदार, सिद्धिविनायक पोरे, आदित्य जामदार, इशिता जवंजाळ, वरदराज पोरे्, सौम्या रेळेकर, अश्मित जवंजाळ, उन्नती पोरे, ज्ञानेश्वरी महाडिक, मैत्री माळवदे या गुणवंत पाल्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
टाळ नृत्य बसवणारे कोरिओग्राफर गणेश सटाले यांचा तसेच टाळ नृत्य सादर करणाऱ्या सर्व महिला भगिनींचा सन्मान श्री.प्रमोद डोंगरे, श्री.प्रशांत पोरे, सौ.हेमलता चांडोले, श्री.नाना जवंजाळ, श्री.संजय फुटाणे, श्री. प्रवीण ढवळे, मदन रेळेकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अकलूज, यशवंतनगर संग्रामनगर, राऊतनगर परिसरातील सर्व शिंपी समाज बंधू भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.