पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत आज पर्यंत तालुक्यातील कासेगांव, करकंब या मंडळातून 1 हजार 302 विविध सेवा व 562 विविध दाखले असे एकूण 1 हजार 864 सेवा व विविध दाखले देण्यात आले असल्याची माहित प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी तेज न्यूजला दिली.
या अभियानातंर्गत निकाली काढण्यात आलेले फेरफार , सातबारा मधील दुरुस्ती , डिजिटल सातबारा , 8 अ उतारे , विविध दाखले , एक खिडकी व्यवस्थे अंतर्गत निकालात काढण्यात आलेले अर्ज , भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेली प्रकरणे , सामाजिक योजना , शिधापत्रिका , कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व कृषी सिंचन योजना , आभा कार्ड, एच.बी, तपासणी व औषधोपचार , ई- मोजणी फेरफार नकाशा ,आदी सेवा व दाखले देण्यात आले. यामध्ये भाळवणी मंडळातून विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
14 मार्चला भाळवणी मंडळात या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी पंढरपूर तालुक्यातील संबधीत मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महाराजस्व समाधान शिबिर मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख,प्रांत अधिकारी सचिन इथापे,तहसीलदार सचिन लंगुटे आणि मंडळातील सर्व लोक प्रतीनिधी, विभागाचे अधिकारी,तलाठी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.तरी जास्तीत जास्त नागरिकांनि उपस्थित राहावे असे आवाहन मंडळ अधिकारी जी टी साठे यांनी केले आहे.

