पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड महाविदयालयामध्ये परदेशात उच्च शिक्षणासाठी उपलब्ध विविध संधी यावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी दिली.
या व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे म्हणून अशीराज ओव्हरसीज एज्युकेशनचे डायरेक्टर मा. अमोल उनुने उपस्थित होते. त्यांनी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून परदेशातील उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती तसेच कमी खर्चात विविध देशांमध्ये उच्च शिक्षण घेण्याच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
अमोल उनुने यांनी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध पात्रता परीक्षा, त्यांचे स्वरूप आणि तयारी कशी करावी याबाबतही सखोल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थीांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मार्गदर्शन करताना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमात तृतीय वर्षातील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे आयोजन सिंहगड महाविदयालयातील आय.आय.सी., एन. डी. एल., रोट्रॅक्ट क्लब आणि अशीराज ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टंट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अजित करांडे, प्रा. अभिजीत सवासे, प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. अमोल गोडसे, प्रा. पूनम गवळी तसेच महाविदयालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.