महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज कलाकार श्रीकृष्ण गोसावी,विदुषी भाग्यश्री देशपांडे,रजत कुलकर्णी भावार्थ देखणे,अवधूत गांधी, प्रियांका क्षीरसागर श्रृती पाटील यांची उपस्थिती
श्री क्षेत्र पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर.आणि सन्मानीय सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे , प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी मुकेश आणेचा यांचे उपस्थितीत श्री गणेशोत्सव संगीत महोत्सव दिनांक २८/२९/३१ऑगस्ट व//३/४/५ सप्टेंबर सहा दिवस श्री संत तुकाराम भवन येथे रात्री ७:३० वाजता आयोजित करण्यात असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आली आहे.
दिनांक २८श्रीकृष्ण गोसावी पैठण यांची अभंगवाणी २९ ऑगस्ट महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका भाग्यश्री देशपांडे मुंबई,यांचा शास्त्रीय अभंगवाणी ३१ ऑगस्ट रोजी नमो ज्ञानेश्वरा भावार्थ देखणे अवधूत गांधी ३ सप्टेंबर रोजी प्रियांका क्षीरसागर या़चा भक्ती संगीत ४ सप्टेंबर रोजी रायगड भुषण श्रृती पाटील आणि ५ सप्टेंबर रोजी किराणा घराण्याचे बेळगाव येथील गायक रजत कुलकर्णी यांच्या सुमधुर गायनाने या गणेशोत्सव संगीत महोत्सवाची सांगता होईल.
तरी पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक आणि कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे.