पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील व्यायाम शाळेतील 5 विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये पै. प्रणव दत्तात्रेय लाडे ५५ की ग्रीको रोमन कुस्ती अंडर 17 मध्ये प्रथम क्रमांक,
पै. पृथ्वीराज रामचंद्र घाडगे ५५ की ग्रीको रोमन कुस्ती अंडर 19 मध्ये प्रथम क्रमांक.
पै. विजय राजेंद्र घाडगे 67की ग्रीको रोमन कुस्ती अंडर 19 मध्ये प्रथम क्रमांक.
पै. आदिती आकाश लोखंडे हिचा 40 की फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंडर 14 मध्ये प्रथम क्रमांक.
पै. संकेत चंद्रकांत बडके 51की फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंडर 19 मध्ये द्वितीय क्रमांक.
पै. ओंकार भीमराव लिंगे 48की फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंडर 17 मध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
या कार्यक्रमास डॉ. नवनाथ खांडेकर , विठ्ठल साखर कारखाना माजी संचालक बाळासाहेब पाटील, प्रशांत माळवदे,विश्वजित देशमुख ,व्यायाम शाळेचे मालक दत्तात्रय गोविंद लाडे,वस्ताद पै. विनायक (आबा) वाघमारे. पै. कृष्ण यलमर याच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.
त्यावेळी डॉ. नवनाथ बापू खांडेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी व्यायामाचे महत्त्व समजून घेऊन व्यायाम करावा. युवकांनी व्यसनापासून दुर राहण्यासाठी व्यायाम करणे कसे गरजेचे आहे, पैलवानांचा आहार कसा असतो. याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच सुपली या छोटेसे गावातून चांगले पैलवान तयार होत आहोत व तालमीत चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी मदत करावे असे डॉ खांडेकर यांनी आवाहन केले. यावेळी प्रशांत माळवदे यांनी उपस्थित सर्व पैलवानांना चांगले भविष्य घडवण्यासाठी शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे आभार तालीम मालक दत्तात्रय लाडे यांनी मानले.
यावेळी अनिल शेवतकर , शरद यलमर, कृष्णा यलमर, विकास विभूते, शिवाजी लोखंडे,भीमराव लिंगे, शिंदे, महादेव लाडे, सुनील लाडे व सर्व लहान मोठे पैलवान ,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.