सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
ज्येष्ठा गौरीपूजन- भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन करावें असें शास्त्र आहे. अनुराधा नक्षत्रावर आवाहन (गौरी आणणे) ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन याप्रमाणे असते. या गौरीपूजनाचा तिथीशी कांहिंहिं संबंध नाही. हा सण नक्षत्र परच आहे.आपल्या डावीकडून प्रथम आले व तिच्या शेजारी कनिष्ठा.
गौरी (महालक्ष्मी) आवाहन ३१-८-२०२५ रविवार दुपारी ५-२७ (१७-२७) मी. पर्यंत अनुराधा नक्षत्र आहे. *अनुराधानक्षत्रावर महालक्ष्मीचे आवाहन करावे*.
वैधृति , विष्टि (भद्रा) काहीही दोष नाही. हे व्रत नक्षत्र प्रधान आहे. सकाळपासून दुपारी ५-२७ (१७-२७) मी. पर्यंत कधीही गौरी (महालक्ष्मी) आवाहन करु शकता.
गौरी पूजन १-९-२०२५ बुधवारी सोमवार *सायंकाळी १९-५५ मी. (७-५५) पर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आहे. *माध्यान्हकाळीं* ज्येष्ठानक्षत्रावर पूजन. कोणाकडे सायंकाळी पूजा असते. त्याप्रमाणे पूजन करावे.
गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर विसर्जन करावें.
२-९-२०२५ मंगळवार रात्री ९-५१ (२१-५१) मी. पर्यंत मूळ नक्षत्र आहे. मंगळवार२-९-२०२५ सकाळपासून रात्री ९-५३ मी. (२१-५१) पर्यंत मूळ नक्षत्र आहे. कधीही जेव्हा वेळ असेल तेव्हा दोरे घेऊ शकता. आणि मुखवटा हलवावा. नंतर आपल्या वेळेनुसार गौरी (महालक्ष्मीचे) विसर्जन करावें.
संदर्भ- आदरणीय श्री दाते पंचांगातुन