पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सध्या रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी येथे कार्यरत असलेले उपशिक्षक राजेंद्र अंकुश मोलाणे -भोसले रा.गादेगाव ता.पंढरपूर हे यूजीसी पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक (सेट-मराठी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोलाणे मळा या ठिकाणी झाले.तसेच महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी झाले.या अगोदरच त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या मराठी व इंग्रजी विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. नुकतीच त्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मधून रयत शिक्षण संस्थेमध्ये उपशिक्षक पदावर नेमणूक झालेली आहे.अत्यंत खडतर प्रवासातुन त्यांनी हे यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, सहशिक्षक वर्षा मोरे, नियाज मुलाणी ,प्राचार्य तनुजा यादव, शितल मस्के ,लीना बागल ,शीतल बागल ,सोमनाथ भूईटे ,अजय सावंत, फर्जना पटेल, शितल राठोड, तेजश्री गव्हाणे, सोनाली मागाडे ,मोनाली गायकवाड ,शाईन मुलाणी, दादासाहेब मोरे, नवनाथ शिंदे ,संतोष खांडेकर, अजय मोरे आदी शिक्षकांनी अभिनंदन केले व गादेगाव ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.