कोरेगांव प्रतिनिधी तेज न्यूज
सातारा जिल्ह्यातील कोरेगांव शहरातील संत नामदेव महाराज मार्गा वरील संत नामदेव महाराज मंदिर येथे बुधवारी संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
नागपूर येथे महासंमेलन दिनांक- १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी भव्य स्वरूपात होणार आहे, महासंमेलनास देशाचे पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तसेच शिंपी समाजातील सर्व पोटजाती व शिंपी समाजातील सर्व संघटना सोबत घेऊन हे महासंमेलन पार पडणार आहे, 5 लाखा पेक्षा जास्त शिंपी समाज बांधव या महासंमेलना च्या मध्ये सामील होणार आहेत आशी माहीती विश्व महासंमेलना च्या मार्गदर्शका उषाताई पोरे यांनी समाज बांधव व भगीणी यांना दिली महासंमेलनाचा उद्देश व नागपूर येथे करण्यात येणारी महासंमेलनाची व्यवस्था याची माहीती यावेळी देण्यात आली.
तसेच पश्चिम महाराष्ट्र महीला मुख्य संघटक सुचिता महाडीक, पुणे विभागीय महिला प्रमुख संगिताताई नाझरे यांनी संत नामदेव महाराजांच्या विचारांची आणि कार्याची पताका उंचावण्यासाठी लाखो च्या संख्येने नागपूर येथे येण्याचे आवाहन केले, यावेळी विश्व महासंमेलन सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी प्रदीप आंबेकर यांची व महीलाच्या मध्ये वैजयंती बाचल, अनिता धोंगडे, आशा कोकणे यांची महासंमेलन प्रसिध्दी व प्रचार व प्रसार या पदि संयुक्तिक निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
बैठकीस माता भगीनी व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते, लाखो च्या संख्येत नागपूर येथे येण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या बैठकीस कोरेगांव शिंपी समाज अध्यक्ष प्रदीप(भाऊ) बाचल, उपाध्यक्ष संदीपभाऊ धोंगडे, योगेश मुळे व समाज बांधवांचे विषेश सहकार्य लाभले.