पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियानांतर्गत पंढरपूर नगरपरिषदेने विविध शाळांमध्ये तिरंगा राखी, तिरंगा रांगोळी स्पर्धा, माझे संविधान निबंध स्पर्धा, समूह गीत गायन स्पर्धा उपक्रम राबवीत नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केली. या उपक्रमास पंढरपूर शहरातून विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पंढरपूर नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच चित्रकला, तिरंगा राखी, तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात पंढरपूर शहरामधील सर्व 15 शाळांमधील 1 हजार 289 विद्यार्थी, 67 शिक्षक व नागरिकांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर हस्ताक्षर व माझे संविधान या विषयावर स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच समूहगीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान ( नागरी) 2.0 अंतर्गत महिला बचत गट (एसएचजी) करिता क्षमता बांधणी या घटका अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये स्वच्छतेचे महत्व पर्यावरण जनजागृती टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे याची मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये 50 बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदविला. तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी यमाई तलाव या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली, नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी शहरात विविध ठिकाणी तिरंगा कॅनव्हॉसची व सेल्फी पॉईंट व्यवस्था करण्यात आली यामध्ये शहरातील नागरिक हे कोणत्याही भारतीय भाषेत “घरोघरी तिरंगा", "हर घर तिरंगा" किंवा "जय हिंद" लिहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली,शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोबाईल शॉपी मध्ये बचत गटातील महिलामार्फत तिरंगा विक्री स्टॉल उभारण्यात आला आहेत त्यामधून नागरिकांना झेंडे उपलब्ध होतील, तसेच छत्रपती शिवाजी चौक येथे तिरंगा मेलाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी आवश्यक विविध वस्तूंची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.