पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोर्टी पंढरपूर येथील अंतिम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी टीई कनेक्टिव्हिटी इंडिया प्रा. लि., शिरवळ या नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीत भिंगेवाडी, ता. आटपाडी येथील जय विजय पाटील, पापरी, ता.मोहोळ येथील प्रशांत दत्तात्रय घागरे, अकलुज येथील शिवम गोरख फुले, एखतपूर, ता.सांगोला येथील विक्रम बिरु कबाडे यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे यशस्वी निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
टीई कनेक्टिव्हिटी ही एक जागतिक दर्जाची आघाडीची कंपनी असून, ती सेन्सर्स, कनेक्टर्स व डेटा सोल्यूशन्सच्या निर्मितीत कार्यरत आहे. कंपनीचे उत्पादन ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, औद्योगिक यंत्रणा, डिफेन्स व अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वापरले जाते. शिरवळ (जि. सातारा) येथील युनिट हे उत्पादन प्रक्रियेतील एक महत्त्वाचे केंद्र असून, येथे आधुनिक यंत्रसामग्री व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून विविध उत्पादने तयार केली जातात.
प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची तांत्रिक ज्ञान, संवाद कौशल्य, विचारशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांची कसून चाचणी घेण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा आणि मार्गदर्शनाचा चांगला उपयोग करून घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, "विद्यार्थ्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या मेहनतीचा आणि महाविद्यालयाच्या गुणवत्ता-प्रधान शिक्षणपद्धतीचा उत्तम नमुना आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशी संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे."
ही निवड विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच नव्हे, तर व्यावसायिक प्रगतीची दारे खुली करणारी असून, टीई कनेक्टिव्हिटीसारख्या नामांकित कंपनीत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोर्टी हे ग्रामीण भागात गुणवत्ता आणि तंत्रज्ञान शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. महाविद्यालय दरवर्षी अनेक नामवंत कंपन्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची संधी उपलब्ध करून देत आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. यशवंत पवार, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. हे यश अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.