म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
रक्षाबंधन या पवित्र सणा निमित्त राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविद्य पत्नी सौ.सोनिया गोरे यांनी इंजि.सुनील पोरे यांचे राखी बांधून औशन केले.
राज्याचे ग्रामीण विकास मंत्री ना.जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविद्य पत्नी सौ.सोनिया गोरे यांनी बोराटवाडी येथे त्यांच्या निवासस्थानी म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांचा रक्षा बंधन या पवित्र सणा निमित्त राखी बांधून औशन केले.
या वेळी सौ.सोनिया गोरे म्हणाल्या इंजि.सुनील पोरे यांचे आमचे कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध आहेत इंजि .पोरे हे ना.जयकुमार गोरे भाऊ यांचे अत्यंत निष्ठावंत समर्थक आहेत
त्यांचे म्हसवड शहर व परिसरात मोठं काम आहे.त्यांनी शहराच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी योगदान दिले आहे पाणी रस्ते या साठी उपोषण केले आहे शिवाय कोरोना काळात त्यांनी कोरोनाग्रस्त लोकांसाठी माणुसकीच्या भावनेतून अन्नदान, अँब्युलन्स, औषधे वाटप असे सामाजिक कार्य केले आहे.
आगामी काळात इंजि पोरे यांच्या हातून मोठं मोठी कामे व्हावीत या करिता रक्षा बंधन या पवित्र सणा निमित्त त्यांच्या हातात राखी बांधत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असल्याचे सुतोवाच सौ.गोरे यांनी केले.यावेळी बाळासाहेब पिसे उपस्थित होते.