पंढरपूर तालुक्यात वाळू माफीयांचे स्तोम माजले आहे.
या वाळू माफियांचा बंदोबस्त
करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. सोमवारी पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात पोलिसांच्या पथकाने वाळूने भरलेला आयशर कंपनीचा ट्रक पकडला. यात अंदाजे दोन ब्रास वाळू , असा एकूण 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील दोन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पंढरपूर तालुक्यातून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे.
सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने वाळू माफियांवर मोठी कारवाई केली. वाळू वाहतूक करणारा आयशर कंपनीचा ट्रक , यात दोन ब्रास वाळू जप्त केली. या वाहनाचा चालक भैय्या उत्तम शिंदे आणि मालक दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. हे दोघेही आंबे येथील रहिवाशी असून , त्यांच्या विरोधात बी एन एस कायदा कलम ३०३,३०५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्यातील भैया उत्तम शिंदे या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे , पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पीएसआय भारत भोसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुजित उबाळे, सुहास देशमुख, मंगेश रोकडे यांच्या पथकाने केली आहे.