मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
१५ ऑगस्ट रोजी आपल्या भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिवस जोगेश्वरी पूर्व येथील श्यामनगर सार्व गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व पत्रकार गणेश हिरवे उपस्थित होते.
त्यांनी आपल्या भाषणात आपण जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदलले तर अनेक चांगल्या गोष्टी जुळून येतील.छोटी छोटी कामे आपण आनंदाने केली तर त्यात खूप समाधान आपल्याला मिळते असा अनुभव सांगितला.शामनगर मंडळाचे कार्य छान असून जोगेश्वरी आणि मुंबईत एक नावाजलेले मंडळ म्हणून त्याचा होणारा उल्लेख ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष दशरथ मोरे, सचिव सुदेश धुरी, कोषाध्यक्ष मितेश साळवी, गणेशोत्सव समन्वय समितीचे सहकार्यवाह शिवाजी खैरनार, ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांनी ध्वजस्तंभ खूप छान सजविला होता.हीरक मोहत्सवा निमित्त यंदा मंडळातर्फे पर्यावरण पुरक कापडी पिशव्या वितरीत करण्यात येणार आहेत अशी माहिती अध्यक्ष मोरे यांनी दिली.