सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल च्या वतीने,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन डॉ. वीरेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत तिरंगा श्रीसेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल कडून करण्यात आलेले होते.त्या अंतर्गत सेवा सप्ताहाची सुरुवात शनिवार रोजी सोलापुरातील शेळगी परिसरात मित्रनगर येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा,आरती व प्रसाद वाटप करण्यात आले.याप्रसंगी अनेक भाविक भक्त उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.रविवार दिं 10 ऑगस्ट रोजी तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभ येथे जाऊन ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहिदांना वंदन करण्यात आले. सोमवार दिं 11 ऑगस्ट रोजी दहीटणे येथील साईबाबा विद्यामंदिर व समाधान प्रशालेमध्ये तिरंगा सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण व मोफत वह्या वाटप करण्यात आले.
मंगळवार दि.12 ऑगस्ट रोजी न्यू रंगराज नगर घरकुल येथील दासरी प्रशालेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने बक्षीस देऊन,खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले. बुधवार दिं 13 ऑगस्ट रोजी भवानी पेठ येथील एस व्ही सी एस कन्नड माध्यमाच्या प्राथमिक शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या,वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन खाऊ वाटप करण्यात आले.गुरुवार दिं 14 ऑगस्ट रोजी कन्ना चौकातील नीलकंठेश्वर प्रशाले मध्ये तिरंगा सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आले. रांगोळी,चित्रकला,वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा इत्यादीतील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तिरंगा सेवा सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजेच शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी मल्लिकार्जुन नगर येथील रोशन प्रशाला मध्ये 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी लायन्सच्या पदाधिकाऱ्याकडून प्रतिमापूजन व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पेन व खाऊ वाटप करण्यात आले. तिरंगा श्रीसेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत या सात दिवसाच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वृंद,पालक व विद्यार्थ्यांचे आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
सदर सप्तांतर्गत कार्यक्रमांमध्ये एकूण 6 शाळेतील सुमारे 800 हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला.
जवळपास तीन ते साडेतीन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व चिक्की व लाडूचे खाऊ वाटप करण्यात आले.या उपक्रमासाठी क्लबचे माजी प्रांतपाल लायन डॉ.गुलाबचंद शहा,माजी प्रांतपाल ला.अरविंद कोणसिरगी व ज्येष्ठ सदस्यांचें मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे यशस्वी नेटके नियोजन अध्यक्ष लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी,सचिव.लायन दिनानाथ धुळम, कोषाध्यक्ष. लायन श्रेणिक शहा, माजी अध्यक्ष. लायन विठ्ठल सारंगी,लायन.हरिहर महिंद्रकर,रिजन चेअरमन. लायन ॲड.श्रीनिवास कटकुर, रीजन सचिव. लायन चंद्रकांत यादव, व सर्व सदस्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.