वाडी कुरोली प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे 79 व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मा. श्री.विकास काळे साहेब,औद्योगिक प्रशिक्षण संस्था अधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष आय.टी.आय चे प्राचार्य संतोष गुळवे सर होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले आजच्या युवकांनी अंधश्रद्धा बाळगून नये.भारत देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. असे सांगितले.
प्रमुख पाहुणे विकास काळे यांनी आपले भाषणांमध्ये सांगितले विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या कुचेकर यांनी केले सूत्रसंचालन अनिल ननवरे यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव चंद्रकात कुंभार, पालक दगडू काळे व सर्व निदेशक, विद्यार्थी उपस्थित होते.